सातारा – धमक असेल तर समोरा-समोर येऊन बोला, कोणी भ्रष्टाचार केला आहे हे जाहीर सभेत सांगतो असं वक्तव्य साता-यांचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केलेल्या आरोपांनंतर उदयनराजे भोसले यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. शिवेंद्रसिंहराजे तुमच्यात धमक असेल तर समोरा-समोर येऊन भ्रष्टाचाराचे आरोप करा. वाटलंस तर गांधी मैदानावर जाहीर सभा बोलवा, त्या सभेत तमुच्या व्यासपीठावर मी जाहिरपणे कुणी कसा भ्रष्टाचार केला आहे हे सांगतो. असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.
दरम्यान उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रसिंहराजेंच्या “बिअर्ड लूक’वरही जोरदार टीका केली आहे. मै नायक नही…खलनायक हूँ, हे चांगलं आहे. खलनायक म्हणजे व्हिलनच असतो. स्पर्धा करावी तर कामातून. असे वेगळे लूक करून करू नये असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे. तसेच दाढी वाढवून लोकांना दम देण्यापेक्षा जप करत बसा. नाही तर लोक म्हणतील सो जा बेटा… शिवेंद्रसिंहराजे आ जायेंगे असा टोलाही यावेळी उदयनराजे यांनी लगावला आहे.
माझ्या ओठात एक अन् पोटात दुसरे हे त्यांनी जाणल्यामुळे मी धन्यवाद देतो. मी एवढी कामे सुरू केली आहेत तरी माझ्याबद्दल एवढा दुजाभाव का? असा सवालही उदयनराजेंनी केला आहे.
COMMENTS