उदयनराजेंनी सांगितला मजेदार किस्सा, शरद पवारांसह सर्वांचाच हशा पिकला !

उदयनराजेंनी सांगितला मजेदार किस्सा, शरद पवारांसह सर्वांचाच हशा पिकला !

सातारा – खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाचा शाही कार्यक्रम शनिवारी पार पडला. या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलत असताना उदयनराजे भोसले यांनी एक मजेदार किस्सा सांगितला. हा किस्सा ऐकूण शरद पवारांसह सर्वांचाच हशा पिकला होता.

उदयनराजेंनी सांगितलेला किस्सा

मागे एका सभेत मी म्हणालो होतो की, 365 दिवस 24 तास कधीही मला हाक मारा, मी तुमच्या सेवेसाठी हजर आहे. रात्री पावणे दोन वाजले होते, मला फोन आला. मी उचलला, मला वाटलं काही महत्त्वाचं काम आहे. मला वाटलं जायला हवं. दोन मुलं होती, ते म्हणाले. काय नाही, आत्ताच पिक्चर सुटला. तुम्हीच सांगितलं होतं 365 दिवस 24 तास कधीही फोन करा, म्हणून केला. मी म्हटलं आत्ता आहात कुठे? म्हणाले, मोती चौकात आहोत. म्हणालो, थांबा तिथंच मी आलोच, हा झाला गंमतीचा भाग… जिल्ह्यातील विकासासंदर्भात काहीही काम असो, समस्या असेल. कधीही घेऊन या त्या मार्गी लावल्या जातील. असं यानिमित्तानं मी तुम्हाला सांगतो.’ असं आवाहनही यावेळी उदयनराजे भोसले यांनी जनतेला केलं.

COMMENTS