पुणे – सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाद मिटण्याची चिन्हे नाहीत. काल सकाळी उदयनराजे विरोधांनी बारातमीमध्ये शरद पवार यांची भेट घेतली. त्यामध्ये त्यांनी उदयनराजे यांच्याविरोधातील तक्रारी त्यांच्या कानावर घातल्या. उदयनराजे सोडून लोकसभेला कोणालाही तिकीट द्या आम्ही त्याला निवडूण आणतो अशा तक्रारी केल्याचं समजतंय. बारामतीमधल्या गोविंद बागेत झालेल्या बैठकीनंतर पवार रात्री पुण्यात परतले. बारामतीमध्ये रामराजे निंबाळकर, शिवेंद्रराजे भोसले, शशिकांत शिंदे यांनी पवारांची भेट घेतली.
पुण्यात पवार रात्री आल्यानंतर तिथे पुन्हा उदयनराजे भोसले यांनी पवार यांची मोतीबागेतील निवासस्थानी भेट घेतली. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या तक्रारी त्यांनी पवारांच्या कानावर घातल्या. तर शरद पवार यांनी उदयराजे यांना संयमाने वागण्याचा सल्ला दिला आहे. तसंच सबुरीनं वागण्याचा सल्ला दिल्याचं कळतंय. दोनच दिवसांपूर्वी शरद पवार साता-यात होते तेंव्हा उदयनराजे यांनी पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी फसवाफसवी करु नका नाहीतर आम्हाला कळतंय अशा शब्दात त्यांनी पवारांना इशारा दिला होता.
COMMENTS