उल्हासनगर महापालिकेत  भाजपला धक्का, शिवसेनेच्या लिलाबाई आशान महापौरपदी!

उल्हासनगर महापालिकेत भाजपला धक्का, शिवसेनेच्या लिलाबाई आशान महापौरपदी!

मुंबई – उल्हासनगर महापालिकेत शिवसेनेनं भाजपला धक्का दिला असून शिवसेनेच्या लिलाबाई आशान या महापौरपदी निवडून आल्या आहेत. टीम ओमी कलानीच्या 10 नगरसेवकांनी भाजपमधून फुटून शिवसेनेला समर्थन दिले. त्यामुळे टीम ओमी कलानी, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीची उल्हासनगर महापालिकेत सत्ता आली आहे.

दरम्यान महापालिकेत एकूण 78 नगरसेवक असून 40 ही मॅजिक फिगर आहे. त्यात भाजपचे सर्वाधिक 32, तर शिवसेनेचे 25 नगरसेवक आहेत. सध्याची राजकीय पार्श्वभूमी पाहता शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतरांचा पाठिंबा मिळणं सहाजिक होतं. त्यानंतरही शिवसेनेची संख्या भाजपइतकीच म्हणजे 32 वर जात होती. परंतु टीम ओमी कलानीच्या पाठिंब्यावर महासेनाआघाडीला बहुमत गाठण्यात यश आलं आहे.

दरम्यान आमच्याशिवाय महापालिकेत सत्ता कोणी स्थापन करु शकत नसल्याचा गैरसमज भाजपला होता. तसेच आम्हाला भाजपनं दाबण्याचा प्रयत्न केला परंतु आम्ही शेवटी भाजपला आमची ताकद दाखवून दिली असल्याचं ओमी कलानी यांनी म्हटलं आहे.

COMMENTS