केंद्रीय मंत्र्यांचा भन्नाट युक्तीवाद, म्हणे नवे बूट चावतातच !

केंद्रीय मंत्र्यांचा भन्नाट युक्तीवाद, म्हणे नवे बूट चावतातच !

इंदोर – जीएसटी घाईघाईत लागू केल्यामुळे व्यापारी आणि सर्वसामान्य त्रासलेले आहेत. त्यामुळे सरकारच्या विरोधात चांगलीच नाराजी आहे. तरीही भाजप नेते वेगेवेगळ्या पद्धतीने जीएसटीचं समर्थन करताना दिसतात. केंद्रीय मंत्री धमेंद्र प्रधान यांनीही काल मध्य प्रदेशमध्ये बोलताना जीएसटीचं समर्थन करताना अजब युक्तीवाद केला. कोणताही नवा बुट खरेदी केला की तो पहिले दोन तीन दिवस चावतोच, त्यानंतर तो पायात आरामात बसतो असं सांगत सुरवातीला जीएसटीचा त्रास होत असला तरी नंतर जीएसटीचा फायदाच होणार असं त्यांनी सांगितलं. आता प्रधान यांचा युक्तीवाद मध्यप्रदेशातल्या आणि देशातल्या जनतेला खरोखर किती पटतो ते पुढील काही दिवसात दिसून येईलच.

COMMENTS