उत्तर प्रदेश पोटनिवडणुकीत भाजपला धक्का, दोन्ही जागांवर सपाचे उमेदवार आघाडीवर !

उत्तर प्रदेश पोटनिवडणुकीत भाजपला धक्का, दोन्ही जागांवर सपाचे उमेदवार आघाडीवर !

उत्तर प्रदेश – उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये घेण्यात आलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा आज निकाल आहे. आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूर, फलपूर आणि बिहारमधील अररिया याठिकाणी लोकसभेसाठी तर बिहारमधील जहाँनाबाद आणि भभुआ विधानसभेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. फुलपूरमध्ये १४व्या फेरीअखेरही समाजवादी पक्षच आघाडीवर असल्यामुळे भाजपला हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. तसेच गोरखपूरमध्येही आठव्या फेरीअखेर सपाच्या प्रवीणकुमार निषाद यांना १,१९,४२७ मतं तर, भाजपचे उपेंद्र शुक्ल यांना १,०८,८२० मतांनी आघाडीवर असल्यामुळे यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मतदारसंघात भाजपची दुर्दशा झाली असल्याचं दिसून येत आहे. आठव्या फेरीअखेर समाजवादी पक्ष ११ हजार मतांनी आघाडीवर आहे.

दरम्यान गोरखपूरमध्ये भाजप विजयपासून आणखी लांब जात असल्याचं दिसून येत आहे. तसेच मतमोजणी पूर्ण होण्याआधीच यूपीत बसप व सपाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आहे.तसेच बिहारच्या अररिया येथे चुरशीची लढत पहायला मिळत आहे. राजदचे आलम पीछाडीवर असून भाजपचे प्रदीपकुमार सिंह ६,६०५ मतांनी पुढे आहेत. तर भभुआमध्ये पाचव्या फेरीअंती भाजपच्या रिंकी राणी पांडे आघाडीवर आहेत.

COMMENTS