उत्तर प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेचा झेंडा !

उत्तर प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेचा झेंडा !

उत्तर प्रदेश स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा आज निकाल लागला. विधानसभेनंतर पुन्हा एकदा सत्ताधारी भाजपनं जोरदार मुसंडी मारली. काँग्रेस, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पक्षाला पुन्हा एकदा पराभवाला सामोरं लावं लागलं. शिवसेनेनंही अलहाबाद महापालिकेत खातं उघडलं आहे. अलहाबादच्या वॉर्ड क्रमांक 40 मधून शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे. शिवसेनेचे दिपेश यादव यांनी तिथे विजय मिळवला आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विट करुन शिवसेनेच्या विजयाची माहिती दिली आहे. ही तर एक सुरूवात असल्याचंही आदित्य यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसंच सर्व मतदारांचे आभार मानून काम करेंगे, दिल जितेंगं असंही आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

COMMENTS