नवी दिल्ली -उत्तर प्रदेशात भाजपच्या अडचणीत वाढ झाली असून आगामी लोकसभा निवडणुकीत सपा, बसपा आघाडीसोबत जाण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वीच सपा, बसपानं याठिकाणी आघाडीची घोषणा केली होती. त्यानंतर आता या आघाडीसोबत काँग्रेसलाही घेतलं जाण्याची शक्यता असून त्यासाठी आघाडीमध्ये हालचाली सुरु झाल्या आहेत.
दरम्यान लोकसभेच्या सर्वात जास्त 82 जागा उत्तर प्रदेशात आहेत. त्यामुळे येथील निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलेलं असतं. याठिकाणी भाजपचं मोठं आव्हान असून ते रोखायचं असेल तर एकट्या पक्षाला लढणं सोपं नाही याची जाणीव बसपा आणि सपाला झाल्याने त्यांनी दोन दशकांचं वैर संपून मैत्री केली आहे. मात्र जास्त जागा सोडण्याची तयारी नसल्याने काँग्रेस या आघाडीत सहभागी झाली नाही. परंतु आता सर्वच पक्षांनी नमतं घेतल्याने काँग्रेसही या आघाडीत सहभागी होण्याची शक्यता आहे.
काँग्रेससाठी 15 जागा सोडण्याची तयारी या पक्षांनी दाखवली असून समाजवादी पक्ष 7 तर बसपा 6 जागा सोडणार आहेत. या आधी 10 जागा देण्याचा प्रस्ताव प्रियांका गांधी यांनी फेटाळला होता. या संदर्भात काँग्रेस, सपा आणि बसपाच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू असून निवडणुकांची तारखा जाहीर होण्याच्या आधी या महाघाडीची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
COMMENTS