मुंबई – सवर्णांना 10 टक्के आरक्षणाबाबत राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला असून केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक दृष्ट्या मागास वर्गाला राज्यात 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यामुळे राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
दरम्यान मागील महिन्यात लोकसभा आणि राज्यसभेतही मंजुरी मिळाली. त्यानंतर आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण देण्याऱ्या विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे आता हे विधेयक कायद्यात रुपांतरीत होणार असून त्यापाठोपाठ आता राज्यतही सवर्णांना आरक्षण देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्यामुळे सरकारी नोकरी आणि शिक्षणामध्ये गरीब सवर्णांना याचा लाभ मिळेल. या निर्णयामुळे आरक्षणाची मर्यादा 49.5 टक्क्यांवरून 59.5 टक्क्यांपर्यंत पोहचणार आहे.
COMMENTS