नाशिक – कोणाच्या समोर काय अडचणी येतील याचा नेम नाही. अशीच वेळ नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील कुर्णोली गावचे उपसरपंच विलास जोशी यांच्यावर आलीय. विलास जोशी यांचं उद्या (12 मार्च) लग्न आहे. मात्र त्यांच्या सहकारी ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणलाय. त्याववर मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी 12 मार्चलाच विशेष सभा बोलवण्यात आलीय. त्यामुळे लग्नाला जायचं की अविश्वास ठरावाला सामोरं जाण्यासाठी विशेष सभेला जायचं असा बाका प्रसंग या तरुण उपसरपंचावर आला आहे.
खरंतर लग्न म्हटलं की खरेदी आली, लग्नपत्रिका वाटणे असेल किंवा इतर अनेक लहान मोठी कामे असतात. मात्र हे सोडून विलास जोशी यांच्यावर सहकारी ग्रामपंचायत सदस्यांची मनधरणी करण्यासाठी वेळ द्यावा लागतोय. विशेष सभेची तारखी बदलवी यासाठी विलास जोशी कायदे तज्ञांची मदत घेत आहेत. वैयक्तिक कारणामुळे सदस्यांनी आपल्या विरोधात कटकारस्थान रचल्याचा आरोप जोशी करतायेत, आयुष्यातील कठीण प्रसंग आणि लग्न सोहळा असे दोन्ही क्षण एकाच दिवशी वाट्याला आल्यानं या विवाह सोहळ्याची जिल्ह्यात खुमासदार चर्चा आहे. आता उद्या नेमकं काय होतं त्याच्याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय. पाहूयात विलास जोशी काय म्हणतायेत ते….
COMMENTS