मुंबई : प्रसिध्द अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी मंगळवारी अखेर शिवसेनेत प्रवेश केला आहे. मातोश्री या खासगी निवासस्थानी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत रश्मी ठाकरे यांनी उर्मिला यांच्या हातावर शिवबंधन बांधले.
शिवसेना पक्षप्रवेशानंतर उर्मिला यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला नमन केले.
राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. त्याआधी उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान, सक्रिय राजकारणात सहभागी न होणाऱ्या रश्मी ठाकरे यांनी पहिल्यांदा कोणाला आपल्या हस्ते प्रवेश दिल्याची घटना घडली. यापूर्वी अनेक राजकिय घडामोडीत सक्रिय नसलेल्या रश्मी ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्या हाती शिवबंधन बांधून आपणही सक्रिय झाल्याचा यानिमित्ताने संदेश दिला.
शिवसेनेत प्रवेशानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या, राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष सोडताना मी राजकारण कधी सोडलं नाही. लोकांमध्ये जाऊन त्यांच्यासाठी काम करण्याची इच्छा आहे. लोकांनी बनवलेली लीडर होणे पसंत करेन. मी शिवसैनिक म्हणून आली आहे आणि शिवसैनिक म्हणून काम करणार आहे. काम करण्याची इच्छा असल्याने कोणत्याही अपेक्षाविना शिवसेनेत प्रवेश केला आहे.
शिवसेनेची महिला आघाडी भक्कम आहे, मला आनंद आहे की मी त्याचा भाग आहे. मुंबईत महिला सुरक्षित असून आणि त्यामुळे मुंबईचा मला अभिमान आहे.
Newer Post
‘दिल्ली’आंदोलनात स्वाभिमानीची उडी
COMMENTS