दिल्ली – माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांनी आज दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खोब्रागडे यांच्याशिवाय बसपा नेते किशोर गजभिये यांनीही आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर उत्तम खोब्रागडे यांनी रामदास आठवले यांच्या आरपीआयमध्ये प्रवेश केला होता. मात्र आज त्यांनी आठवलेंना सोडचिट्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
माजी सनदी अधिकारी व रिपाइं नेते उत्तम खोब्रागडे आणि माजी सनदी अधिकारी व बसपा नेते किशोर गजभिये यांनी आज दिल्ली येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी दोन्ही नेत्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले pic.twitter.com/ezgutg7KCO
— Ashok Chavan (@AshokChavanINC) February 9, 2018
उत्तम खोब्रागडे हे शिस्तीचे सनदी अधिकारी होते. ते बेस्टमध्ये असताना त्यांनी कामगारांसाठी घेतलेल्या निर्णयामुळे ते कर्मचारी वर्गात चांगलेच लोकप्रिय झाले होते. उत्तम खोब्रागडे हे कामगार वर्गाबरोबरच दलित वर्गातही चांगलेच प्रसिद्ध आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांचा काँग्रेस पक्षाला चांगला फायदा होऊ शकतो. मुंबईत लोकसभा निवडणुकीत एखाद्या मतदारसंघातून ते काँग्रेसचे उमेदवारही असू शकतात अशी शक्यता वर्तविली जात आहे.
COMMENTS