राष्ट्रवादीचा धक्का, शंकर सिंह वाघेलांचा राष्ट्रवादीत प्रवेश !

राष्ट्रवादीचा धक्का, शंकर सिंह वाघेलांचा राष्ट्रवादीत प्रवेश !

नवी दिल्ली – आगमी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं जोरदार धक्का दिला असून  गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकेकाळचे खास सहकारी असलेले शंकरसिंह वाघेला यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात अधिकृतपणे प्रवेश केला आहे.

वाघेलांचा राजकीय प्रवास

वाघेला हे सुरुवातीला भाजपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी 1995 भाजप सोडली. त्यानंतर काँग्रेसचा बाहेरुन पाठिंबा घेत 1996 मध्ये ते गुजरातचे मुख्यमंत्री बनले. नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि मनमोहन सिंह सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रिपदही मिळालं. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी प्रदेशाध्यक्ष तसंच गुजरात विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणूनही काम केलं. नंतर 2017 च्या विधानसभा निवडणुकीआधी शंकरसिंह वाघेला यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली त्यानंतर राज्यसभा निवडणुकीत वाघेला यांनी काँग्रेसच्या अहमद पटेल यांच्याविरोधात भाजपाला मदत केली होती.

COMMENTS