पंकजा मुंडेंच्या कारखान्यावर कारवाई करणं अधिका-याला पडलं महागात !

पंकजा मुंडेंच्या कारखान्यावर कारवाई करणं अधिका-याला पडलं महागात !

बीड – ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याचा परवाना निलंबित करणे एका अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. अभिमन्यू केरुरे या अन्न आणि औषध प्रशासनाच्या अतिरिक्त आयुक्त असणाऱ्या अधिकाऱ्यावर शासनाने निलंबनाची कारवाई केली आहे.  कारखान्याला परवाना देण्याचे काम एफडीएच्या अधिकार क्षेत्रात येत नसल्याने आयुक्तांनी अधिकाराचा गैरवापर केल्याचं कारण देत केरुरे यांना निलंबित करण्यात आलं आहे. तसेच वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावरील कारवाई मागे घेऊन दुर्घटनेनंतर रद्द करण्यात आलेला कारखान्याचा परवाना पुन्हा बहाल करण्यात आला आहे.

डिसेंबर महिन्यामध्ये परळी येथील वैद्यनाथ साखर कारखाण्यात रसाची टाकी फुटून झालेल्या अपघातात 7 कामगार ठार झाले होते,त्यानंतर या कारखान्याचा परवाना 11 ते 20 एप्रिल दरम्यान निलंबित करण्यात आला होता,बीडचे अतिरिक्त आयुक्त अभिमन्यू केरुरे यांनी ही कारवाई केली होती.

दरम्यान मंत्र्यांचा कारखाना असतानाही त्याचा परवाना निलंबित करणे या अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे,अन्न आणि औषध प्रशासनाच्या वरिष्ठांनी केरुरे यांच्यावर ठपका ठेवत निलंबनाची कारवाई केली आहे

COMMENTS