मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहूजन आघाडीची ताकद आणखी वाढणार असल्याचं दिसत आहे. कारण दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला असून ते वंचित बहुजन आघाडीसोबत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आम आदमी पार्टी
वंचित बहुजन आघाडीत सामील झाली तर
राज्यात वंचितची ताकद वाढणार असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने राज्यात आपली ताकद दाखवली होती. त्यामुळे वंचितला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत घेण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. परंतु वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर मात्र एकला चलोच्या भूमिकेत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे वंचित बहूजन आघाडीत आम आदमी पक्षाात सामील होणार असल्याची चर्चा आहे.
COMMENTS