वंचित बहूजन आघाडीचा काँग्रेसला अल्टिमेटम, ‘एवढ्या’ जागा लढवणार !

वंचित बहूजन आघाडीचा काँग्रेसला अल्टिमेटम, ‘एवढ्या’ जागा लढवणार !

मुंबई – लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहूजन आघाडीला सोबत घेण्याचा विचार काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या काँग्रेसच्या बैठकीत वंचित बहूजन आघाडीला सोबत घेण्याबाबत चर्चा करण्यात आली होती. याबाबत आता वंचित बहूजन आघाडीनं काँग्रेसला अल्टीमेटम दिला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला आम्ही ४० जागा सोडत आहोत. वंचीत बहूजन आघाडी विधानसभेच्या २४८ जागांवर निवडणुक लढवेल. त्यांना मंजूर असेल तर त्यांनी येत्या १० दिवसात उत्तर द्यावे असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सरचिटणीस गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. तसेच काँग्रेसला चर्चा करायची असेल तर अधिकृतपणे आमच्या पदाधिकारी यांच्या सोबत चर्चा करावी असंही पडळकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता काँग्रेस यावर काय निर्णय घेणार ते पाहण गरजेचं आहे.

COMMENTS