वंचित बहुजन आघाडीची स्वबळाची तयारी,  पहिली यादी 30 जुलैला जाहीर होणार !

वंचित बहुजन आघाडीची स्वबळाची तयारी, पहिली यादी 30 जुलैला जाहीर होणार !

औरंगाबाद –  आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीनं स्वबळाची तयारी सुरु केली असून विधानसभा उमेदवारांची पहिली यादी 30 जुलैला जाहीर होणार आहे. पहिल्या यादीत विदर्भातील उमेदवारांचा समावेश असणार आहे. विदर्भातील उमेदवारांच्या मुलाखतीही पूर्ण झाल्या आहे. 13 ते 16 जुलैपर्यंत विदर्भातील सर्व मतदारसंघासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. यानंतर आता मराठवाड्यातील मतदारसंघासाठी मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

मराठवाड्यातील मुलाखती उस्मानाबादमध्ये 21 जुलै, बीड 22 जुलै, लातूर – 23 जुलै, नांदेड – 24 जुलै, हिंगोली – 25 जुलै, परभणी – 26 जुलै, औरंगाबाद – 27 जुलै, जालना – 28 जुलै रोजी पार पडणार आहे. या मुलाखती वंचित बहुजन आघाडी पार्लमेंटर्री बोर्ड सदस्य अॅड अण्णाराव पाटील, अशोकभाऊ सोनोने आणि रेखाताई ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेतल्या जाणार आहे.

दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसकडे 40 जागांची मागणी केली आहे. मात्र दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या सर्व जागा लढवण्याची तयारी देखील सुरु केली आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या मनात सध्या काय सुरु आहे याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

COMMENTS