…म्हणून श्रीनिवास वनगांना भाजपने उमेदवारी नाकारली, उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप !

…म्हणून श्रीनिवास वनगांना भाजपने उमेदवारी नाकारली, उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप !

वसई – पालघर पोटनिवडणुकीमध्ये भाजप, शिवसेना आणि काँग्रेसनं प्रचाराची राळ उठवली आहे. शिवसेना आणि भाजपचे नेतेही एकमेकांवर चांगलीच चिखलफेक करत आहेत. खासदार चिंतमण वनगा यांच्या निधनामुळं ही निवडणूक लागली आहे. चिंतामण वनगा यांनी वाढवन बंदराला आणि बुलेट ट्रेनला विरोध केला होता. त्याची सल भाजपच्या नेत्यांना होती. त्यामुळेच चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना भाजपनं तिकीट नाकारल्याचा गंभीर आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. वसईमध्ये झालेल्या प्रचारसभेत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला योगी आदित्यनाथ यांनी चप्पल घालून पुष्पाहार अर्पण केल्याप्रकरणीही त्यांनी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शिवरायांचा अवमान केल्याची टीकाही उद्धव यांनी केली. तुम्ही आमच्या राजाचा असा अवमान करत असाल तर तुम्ही कोण, तुमची किमंत कस्पटाप्रमाणे आहे असंही उद्धव म्हणाले. एका आदिवासी पोराला पाडण्यासाठी भाजपला प्रचारासाठी नेते आयात करावे लागत आहेत. जे आपला स्वतःचा गोरखपूर मतदारसंघ वाचवू शकले नाहीत, ते इथे येऊन काय दिवे लावणार अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांचा समाचार घेतला.

COMMENTS