लखनऊ – वाराणसी लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान मोदी यांना बीएसएफच्या जवानानं आव्हान दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात समाजवादी पार्टीनं बीएसएफचे जवान तेजबहादूर यादव यांना उमेदवारी दिली आहे. यापूर्वी सपानं वाराणसीतून शालिनी यादव यांना उमेदवारी जाहीर केली होती. परंतु पंतप्रधान मोदी यांना तगडं आव्हान देण्यासाठी तेजबहादूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान तेजबहादूर यांनी जवानांना मिळत असलेल्या निकृष्ट जेवणाबाबत आवाज उठविला होता. या कारणावरून यादव यांना सेवेत बडतर्फ करण्यात आले होते. त्यामुळे सपाने त्यांना उमेदवारी दिली आहे. या उमेदवारीचा फायदा सपाला होणार का हे पाहणं गरजेचं आहे. तेजबहादूर यांच्यासोबतच पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात एकूण 111 जवान व एक निवृत्त न्यायाधीश निवडणूक लढवत आहेत. तसेच काँग्रेसकडून अजय राय हे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचं दिसत आहे.
COMMENTS