मुंबई – वर्षा राऊत यांना ईडीचे नोटीस आल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली होती. त्यामुळे वर्षा राऊत ईडी कार्यालयात हजर होण्यावेळी शक्तीप्रदर्शन केलं जाणार असल्याचं बोलले जात होते. वर्षा राऊत या दि. ५ जानेवारीला हजर होणार होत्या. मात्र, त्यात एक दिवस अगोदरच ईडी कार्यालयात हजर झाल्या.
काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना व त्यांचा मुलगा विहंग सरनाईक याला ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागले. दरम्यान, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना पीएमबीच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीची नोटीस पाठवली होती. राऊत यांच्याकडून ५ तारखेला ईडी कार्यालयात हजर राहणार असल्याचे कळविण्यात आले होते. त्या उद्या (५ जानेवारी) ईडीसमोर हजर होणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र सोमवारी (४ जानेवारी) वर्षा राऊत ईडी कार्यालयात दाखल झाल्या. त्यांची तीन तास चौकशी केली जाणार असल्याचं वृत्त आहे.
वर्षा राऊत ईडी कार्यालयात दाखल होताना शिवसेनेकडू शक्ती प्रदर्शन केलं जाणार असल्याची चर्चा होती. ती गर्दी व गोंधळ टाळण्यासाठीच वर्षा राऊत एक दिवस आधीच चौकशीसाठी हजर झाल्याचं बोललं जात आहे.
COMMENTS