अकोला – अकोल्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री वसंतराव धोत्रे यांचं वृद्धापकाळानं निधन झालंय. ते ८५ वर्षांचे होतेय. काल संध्याकाळी ५ वाजता त्यांनी अंतिम श्वास घेतलाय. त्यांची १९८५ ते ९० दरम्यान बोरगावमंजू विधानसभा मतदार संघातून विधानसभेवर निवड झाली होती. ते १९८६ ते १९९० दरम्यान शंकरराव चव्हाण आणि शरद पवार मंत्रिमंडळात क्रीडा आणि सहकार खात्याचे राज्यमंत्री होतेय. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील दिग्गज म्हणून त्यांची ओळख आहे.
दरम्यान अकोला बाजार समिती, खरेदी विक्री संघ, सोसायट्यांवर त्यांची सत्ता आहे. याशिवाय अकोला जिल्हा बँकेवरही त्यांची पकड आहे. अलीकडचे विदर्भातील सर्वात मोठ्या शिवाजी शिक्षण संस्थेवर त्यांच्या गटाची सत्ता स्थापन झालीय. अकोल्याचे भाजप खासदार संजय धोत्रे यांचे ते सख्खे चुलतभाऊ आहेत. शरद पवारांचे विदर्भातील कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख होती. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यावर त्यांना साथ देणा-या विदर्भातील प्रमुख नेत्यांत त्यांचा समावेश होता. त्यांच्या निधनानं अकोला जिल्हा आणि विदर्भानं राजकीय आणि सहकार क्षेत्रातला एक रूषीतूल्य मार्गदर्शक हरवल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये आहे. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
COMMENTS