राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये घमासान, मुख्यमंत्र्यांच्याविरोधत स्वपक्षातूनच “चले जाव” चा नारा !

राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये घमासान, मुख्यमंत्र्यांच्याविरोधत स्वपक्षातूनच “चले जाव” चा नारा !

जयपूर – राजस्थानमध्ये येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर विधानसभेची निवडणूक होणार आहे. सत्तेत असलेल्या भाजपविरोधात आता स्वःपक्षातूनच नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. मुख्यमंत्री वसंधुरा राजे यांच्या स्वःताच्या जिल्ह्यातच त्यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. झालवाडमध्ये मुख्यमंत्र्याविरोधात प्रदीप शर्मा यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री परत जा अशा घोषणा देत मोर्चा काढण्यात आला.  या मोर्चामध्ये सुमारे दीड हजार कार्यकर्त्यांनी भाग घेतला. त्यामुळे भाजपातच सर्वकाही आलबेल नसल्याचं दिसून येतंय. वसुंधरा राजे झालवाड छोडो अशी मोहीम त्यांनी सुरू केली आहे.

प्रदीप शर्मा हे गेली 20 वर्षापासून पक्षाचे निष्ठावंत म्हणून कार्य करत आहेत. गेल्या 30 वर्षांपासून मुख्यमंत्री या ठिकाणचे प्रतिनिधीत्व करत आहेत. कधी खासदार तर कधी आमदार म्हणून त्यांनी या ठिकाणचे नेतृत्व केले आहे. या दरम्यानच्या काळात दोन वेळा त्या मुख्यमंत्रीपदीही राहिल्या आहेत. तरीही झालवाडचा विकास झाला नाही. सर्वसामान्य लोकांसाठी त्यांनी काहीच केले नाही असा आरोपही प्रदीप शर्मा यांनी केला आहे. राज्यभरात निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही व्यक्त केल्या आहेत असा इशाराही त्यांनी भाजपच्या मुख्यमंत्र्यांना दिला आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांचं वसुंधरा राजे यांनी गळचेपी केली असाही आरोप शर्मा यांनी केला आहे. दरम्यान झालवाडच्या भाजप अध्यक्षांनी प्रदीप शर्मा यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. मुख्यमंत्र्यांनी झालवाडचा विकास केल्याचा दावा जिल्हाध्यक्षांनी केला आहे. झालवाड जिल्ह्याचे खासदार दुष्यंत  सिंह हे वसुंधरा राजे यांचे चिरंजीव आहेत. तर त्याच जिल्ह्यातील झालरापाटन विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत आहेत.

COMMENTS