नवी दिल्ली – काँग्रेससह विरोधी पक्षांना जोरदार झटका बसला असून भारताचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी फेटाळला आहे. व्यंकय्या नायडू यांनी 20 पानांच्या आदेशात महाभियोग प्रस्ताव फेटाळण्याच्या कारणांचा उल्लेख केला आहे. यात एक तांत्रिक कारण त्यांनी दिलं असून सात निवृत्त खासदारांनीही महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी केली असून ते कायदेशीररित्या चुकीचं असल्याचं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. त्यामुळे दीपक मीश्रा यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे.
दरम्यान या प्रस्तावावर काँग्रेसह 71 खासदारांनी स्वाक्षरी केली होती. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची भेट घेऊन महाभियोगाचा प्रस्ताव दिला होता. सीबीआय न्यायाधीश बी.एच. लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र चौकशीची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर विरोधक आक्रमक झाले होते. त्यामुळे काँग्रेससह अन्य विरोधीपक्षांनी शुक्रवारी महाभियोग प्रस्ताव आणला होता. मात्र या प्रस्तावावरील स्वाक्षरी केलेल्या 71 पैकी सात खासदार निवृत्त असल्याचं कारण देत, उपराष्ट्रपतींनी सरन्यायाधीशांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला आहे. त्यामुळे विरोधी पक्षांना जोरदार झटका बसला आहे.
COMMENTS