मुंबई – विधान परिषदेच्या आज झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रसाद लाड हे विजयी झाले आहेत. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे दिलीप माने यांचा पराभव केला. प्रसाद लाड यांना 209 मते मिळाली. तर दिलीप माने यांना 73 मते मिळाली. दोन मते बाद झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मते मोठ्या प्रमाणात फुटली आहेत.
प्रसाद लाड यांच्या विजय अपेक्षित मानला जात होता. कारण भाजप आणि शिवसेना एकत्र आल्यामुळे त्यांच्याकडे विजयासाठी अपेक्षीत मतांपेक्षा जास्त मते होते. प्रश्न कोण किती मते मिळवाणार हाच होता.
आज झालेल्या मतदानात विधानसभेच्या 288 पैकी 284 आमदारांनी मतदान केलं. एमआयएमच्या दोन आमदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला. तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मतदान केलं नाही. तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना न्यायालयाने मतदान करण्यास बंदी घातली आहे.
COMMENTS