विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर ।

विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर ।

मुंबई – महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर ही पोटनिवडणूक घेण्यात येणार असून ही जागा विधानसभेच्या आमदारांमधून निवडून देण्यात येते. त्यामुळे या जागेसाठी विधानसभेतील आमदार मतदान करणार आहेत.

दरम्यान या जागेसाठी 7 जून रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. विधानसभेतील संख्याबळ पाहता या निवडणुकीसाठी भाजपचे पारडे जड आहे. त्यामुळे याठिकाणी भाजपचा उमेदवार निवडून येऊ शकतो असा अंदाज त्यामुळे या जागेवर कोणाला संधी मिळणार हे पाहण गरजेचं आहे. निवडून येणा-या सदस्याची मुदत 24 एप्रिल 2020 पर्यंत असणार आहे.

COMMENTS