मुंबई – काँग्रेसच्या माजी आमदाराला विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपनं उमेदवारी दिली आहे. राज्यसभा उमेदवारांच्या दुसऱ्या यादीसह भाजपने धुळे नंदुरबार मतदारसंघातून अमरिश पटेल यांना उमेदवारी जाहीर केली आहे.काही दिवसांपूर्वीच अमरिश पटेल यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेवरील पोटनिवडणुकीसाठी अमरिश पटेल आता भाजपच्या तिकीटावर मैदानात उतरले आहेत.
दरम्यान काँग्रेसला रामराम ठोकून भाजपचा झेंडा हाती धरताना अमरिश पटेल यांनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. या जागेसाठी 30 मार्चला मतदान प्रक्रिया पार पडणार असून दुसऱ्याच दिवशी म्हणजे 31 मार्चला मतमोजणी होणार आहे. तसेच अमरिश पटेल यांच्याविरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार याकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS