विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी पार पडलं मतदान !

विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी पार पडलं मतदान !

मुंबई  स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडण्यात येणाऱ्या विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी आज मतदान घेण्यात आलं. नाशिक,  लातूर-उस्मानाबाद- बीड, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, परभणी-हिंगोली, अमरावती, आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या मतदारसंघात ही निवडणूक पार पडलं आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

लातूर-उस्मानाबाद-बीड

दरम्यान लातूर-उस्मानाबाद-बीडच्या जागेसाठीची निवडणूक सर्वात चुरशीची मानली जात आहे. कारण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषेदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची केली आहे.या मतदारसंघात भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात लढत होत आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कोकण

कोकणात राष्ट्रवादी काँग्रेसने सुनील तटकरे यांचा मुलगा अनिकेत तटकरे यांना,  तर शिवसेनेने राजीव साबळे यांना उमेदवारी दिली आहे. नारायण राणे यांनी शिवसेनेला विरोध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे.

अमरावती

अमरावतीत भाजपचे प्रवीण पोटे आणि काँग्रेसचे अनिल मधोगरिया यांच्यात सरळ लढत होत आहे.

नाशिक

नाशिकमध्येही विधानपरिषद निवडणुकीत रंगत वाढली आहे. इथे शिवसेनेचे नरेंद्र दराडे विरुद्ध राष्ट्रवादीचे शिवाजी सहाणे यांच्यात सामना होत आहे. परंतु पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतला वचपा काढण्यासाठी इथे भाजप थेट राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

COMMENTS