मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह 9 जणांनी विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली आहे. सभापती रामराजे निंबाळकर यांनी या 9 सदस्यांना शपथ दिली. शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, काँग्रेसचे राजेश राठोड, तर भाजपचे रमेश कराड, प्रविण दटके, गोपीचंद पडाळकर, रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली.
दरम्यान यावेळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर धनगरी वेशात शपथविधीसाठी विधान भवनात दाखल झाले होते. विधानपरिषदेत फक्त धनगरच नाही तर समस्त बहुजन समाजाचा आवाज होऊन सरकारला जाब विचारण्याचे काम करणार असल्याचा निर्धार पडळकर यांनी बोलून दाखवला. तर आजपर्यंत ज्या वंचित समाजाचा आवाज या सभागृहापर्यंत पोहचला नाही त्यांचा आवाज मी आता उठवणार असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.
COMMENTS