मुंबई – विधान परिषदेच्या 6 जागांसाठी पैकी पाच जागांची मतमोजणी आज झाली. पाचपैकी भाजपनं 2, शिवसेनेनं 2 तर राष्ट्रवादी काँग्रेसनं 1 जागा जिंकली. काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागले. हिंगोली परभणी या मतदारसंघात शिवसेनेच विप्लव बजोरिया विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या सुरेश देशमुख यांचा पराभव केला आहे. विल्पव बजोरिया यांना 254 तर सुरेश देशमुख यांना केवळ 221 मते मिळाली. या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांची बेरीज युतीच्या मतांच्या बेरजेपेक्षा कितीतरी जास्त होती. तरीही काँग्रेसचे देशमुख पराभूत झाले. या ठिकाणी आघाडीची मते मोठ्या प्रमाणात फुटली.
नाशिकमध्ये भाजपने राषट्रवादीचे उमेदवार शिवाजी सहाने यांना पाठिंबा देऊनही तिथं शिवसेनेचे नरेंद्र दराडे विजयी झाले. या ठिकाणी आघाडीची आणि भाजपची मते मोठ्या प्रमाणात फुटली आहेत. तर तिकडे अमरावती मतदारसंघात भाजपचे प्रविण पोटे विजयी झाले आहेत. या ठिकाणी काँगेसचे मधोगडिया यांचा मानहाणीकारक पराभव झाला आहे. त्यांना केवळ 17 मते मिळाली. तर वर्धा चंद्रपूर गडचिरोली या मतदारसंघात काँग्रेस आघाडीची मते कमी असूनही तिथं चुरशीची लढत पहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ रत्नागिरी-रायगड-सिंधुदुर्ग मतदारसंघात विजय मिळवता आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल तटकरे विजयी झाले आहेत.
COMMENTS