मंत्रीपद गेलं तरी चालले पण ओबीसी आरक्षणाला हात लावून देणार नाही – वडेट्टीवार

मंत्रीपद गेलं तरी चालले पण ओबीसी आरक्षणाला हात लावून देणार नाही – वडेट्टीवार

जालना : आम्ही पूर्ण ताकदीनिशी मराठा समाजाबरोबर आहोत. मात्र आम्हाला ओबीसी समाजामधून आरक्षण द्या म्हणणे पूर्ण चुकीचं आहे. जर असा प्रयत्न झालाच तर मंत्री पद गेले तरी चालेल पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नसल्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडट्टीवार यांनी म्हटले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड येथे ओबीसी समाजाचे पहिले मराठवाडास्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

ओबीसी मेळाव्यात बोलताना वडेट्टीवार यांनी म्हटलं की, ओबीसी आरक्षणाला कोण हात लावतो ते पाहू. विजय वड्डेटीवार जिवंत आहे तोवर धक्का लावायचा विषय नाही. वाटेल ते काय काढायचं असेल तर काढू आपल्याकडे घोंगड आहे आणि काठी पण आहे. कोणाला कितीही देऊ द्या पण आमच्या हक्काचं नको. आमच्या वाट्याचं आरक्षण देऊ नका. आमच्या वाट्याला धक्का लावू नका, ही आमची विनंती आहे.

मराठा आरक्षणाचा विषय आता राज्य सरकारच्या हातात नाही. उच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर कोण सर्वोच्च न्यायालयात गेल. त्यावेळी  कोण शुक्राचार्यानं बाजू मांडली माहिती नाही. मात्र हे मराठा समाजाचं दुर्देव असून फडणवीस काय सुप्रीम कोर्ट नाही, असेही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS