मुंबईः पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला असून या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप करीत राजीनाम्यांची मागणी केली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतील नेते व मंत्र्यांनी सावध भूमिका घेतली आहे. पण काॅंग्रेसचे नेते व मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला आहे.
वड्डेटीवार म्हणाले, ‘भाजप नेत्यांची महिलांबाबत डझनभर प्रकरणं मला सांगता येतील. पण, भाजपा नेत्यांना नैतिकता लागू पडत नाही, तिथे नैतिकता संपुष्टात येते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या प्रकरणी स्पष्ट भूमिका घेतली असून या प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल,’ असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं आहे.
COMMENTS