मुंबई – शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. फार पूर्वी ‘थोरातांची कमळा’ हा चित्रपट गाजला होता, आता ‘विखे पाटलांची कमळा’ असा चित्रपट आला अन पडला. काँग्रेसची खाट कुरकुरते की नाही ते पाहू, पण विखेंची ‘टूर अँड ट्रॅव्हल’ कंपनी बंद पडली आहे, मात्र त्यांची टूरटूर सुरु असल्याची टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
दरम्यान वरचेवर पक्ष बदलण्याची कला विखेंना अवगत आहे आणि आपण आधीच्या पक्षात असताना काय उद्योग केले हे विसरण्याच्या कलेतही ते पारंगत आहेत. विखेंची मूळ पोटदुखी अशी आहे कीम नगर जिल्ह्याच्या राजकारणातील त्यांचे प्रतिस्पर्धी बाळासाहेब थोरात हे आता सत्तेत आहेत आणि निवडणुकीआधी सत्तेसाठी भाजपच्या चरणी लीन होऊनही विखे वनवासात आहेत. विसरण्याच्या कलेत किती पारंगत आहोत याचे प्रयोग विखे स्वतः अधूनमधून करत असतात. विखे महाशयांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविषयी असे महान भाष्य केले, की “एवढे वर्ष काँग्रेससोबत होतो, मात्र सत्तेसाठी लाचार झालेले प्रदेशाध्यक्ष आपण यापूर्वी कधीच पाहिले नाहीत”. यावर शांत बसतील ते थोरात कसले. थोरातांनीही सांगितले की “मी विखे यांना आधीच्या मुख्यमंत्र्यांच्या पाया पडताना अनेकदा पाहिले आहे” यावर विसराळू विखेंची बोलती बंद झाली. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारु नयेत, हा साधा नियम विखे विसरले असतील, तर त्यांनी राजकारणातून तूर्त दूर झालेले बरे अशी टीकाही सांनातून करण्यात आली आहे.
काय म्हणाले होते विखे-पाटील ?
काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार टीका केली होती. मी पक्ष सोडला म्हणूनच बाळासाहेब थोरात यांना काँग्रेस पक्षात पद मिळालं, बाळासाहेब थोरात यांचं स्वतःचं कर्तुत्वॆ काय असा प्रश्नही विखे-पाटील यांनी उपस्थित केला आरहे. थोरात हे गांधी-नेहरुंचे विचार सोडून मातोश्रीचे उंबरठे झिजवत आहेत.
राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी बाळासाहेब थोरातांनी पुढाकार घेतला असता, तर आनंद वाटला असता. मात्र केवळ सत्तेत वाटा मिळवण्यासाठी लाचारी केली जात आहे. स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी बाळासाहेब थोरातांची धडपड सुरु असल्याचंही विखे यांनी म्हटलं होतं.
COMMENTS