राधाकृष्ण विखे-पाटील यांना डेंग्यूची लागण !

राधाकृष्ण विखे-पाटील यांना डेंग्यूची लागण !

मुंबईविधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकूष्ण विखे पाटील यांना डेंग्यूची लागण झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपूर अधिवेशनातच विखे पाटील यांना डेग्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून विखे पाटलांनी आज लोणीत येवून रक्ता़ची चाचणी केली असता त्यांना डेग्यू झाला असल्याचं समोर आलं आहे. तसेच विखे पाटलांवर उपचार सुरु असून काही दिवस त्यांना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

दरम्यान नागपूरमध्ये पहिल्यांदाच पावसाळी अधिवेशन भरवण्यात आले होते. नागपुरात पावसाने घातलेल्या धुमशानामुळे अधिवेशन चांगलेच गाजले होते. परंतु त्याठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना डेंग्यूची लागण झाली असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान विखे पाटील यांच्यावर त्यांच्या घरीच उपचार केले जात असून त्यांची प्रकृती स्थीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

 

COMMENTS