मुंबई – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश करताच मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. विखे पाटील यांच्याकडे गृहनिर्माण हे खातं देण्यात आलं आहे. परंतु सध्या विखे पाटील यांच्या एक पत्र सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल झालं आहे. विखे पाटील यांनी काँग्रेसमध्ये असताना भाजप सरकारवर जोरदार टीका केली होती. परंतु आज याच भाजपमध्ये ते सामील झाले आहेत. यावरुन त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
दरम्यान लोकसभा निवडणुकीपूर्वी विखे पाटील यांनी वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना पत्र लिहिलं होतं. या पत्रात त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. देशात भाजपचा संविधानाला डावलून मनमानी कारभार सुरु असल्याची टीका त्यांनी केली होती. देशातील अल्पसंख्यांक, दलित, आदिवासी आणि बहूजन समाजावर अत्याचार केले जात असल्याचं विखे पाटील यांनी म्हटलं होतं. परंतु भाजपवर जोरदार टीका करणारे विखे पाटील आज भाजपच्या कळपात सामील झाले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर विखे पाटलांच्या या भूमिकेवर टीका केली जात आहे.
COMMENTS