अहमदनगर – राधाकृष्ण विखे पाटील यांचा विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज धोक्यात येण्याची शक्यता आहे. काँग्रेसनं विखेंच्या अर्जावर आक्षेप घेतला आहे. राधाकृष्ण विखेंनी ज्या वकिलाकडून प्रतिज्ञापत्र तयार केले. त्या वकिलाला प्रतिज्ञापत्र करण्याचा अधिकारच नसल्याचा दावा काँगेेसनं केला आहे.काँग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांनी संबंधित प्रकाराबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. शिर्डीतील विधानसभा मतदारसंघासाठी विखे हे सर्वात अधिक मोठे दावेदार आहेत. अशावेळी त्यांच्याच उमेदवारी अर्जावर गंडांतर आल्यामुळे विखे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीसाठी दाखल केलेल्या अर्जावर काँग्रेसनं आक्षेप घेतला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्याकडून सील करण्यात आला आहे. यावर सर्व बाजू तपासून निर्णय घेतला जाईल असं अधिकाय्रांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रावर शिक्का मारणाऱ्या नोटरीची टर्म संपल्याचं लक्षात आल्यानंतर काँग्रेसने उमेदवारी अर्ज बाद करावा अशी मागणी केली आहे.
COMMENTS