खोटारडे आणि दळभद्री सरकार यापूर्वी पाहिले नाही – विखे पाटील

खोटारडे आणि दळभद्री सरकार यापूर्वी पाहिले नाही – विखे पाटील

नागपूर –  उद्यापासून विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत असून या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील नेत्यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. यादरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली. खोटारडे आणि दळभद्री सरकार याआधी महाराष्ट्राने पाहिले नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच बुधवारी अधिवेशन सुरू करतायत, सरकारने अधिवेशनासाठी मुहूर्त बघितला असणार. फिटनेस चॅलेंज सरकार स्वीकारते, मात्र लोकांच्या प्रश्नांच्या चॅलेंजवर सरकार उताणे पडलं असल्याची टीकाही विखे-पाटील यांनी केली आहे. तसेच फसवणीस सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कर्जमाफी योजना जाहीर केली, मात्र शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळाली नसल्याचीही टीका यावेळी विखे-पाटील यांनी केली आहे.

दरम्यान यावेळी राज्यातील विविध प्रश्नांवर बोलत असताना त्यांनी सरकारवर जोदार ताशेरे ओढले आहेत. नाणार प्रकल्पावरुन त्यांनी शिवसेनेवर टीका केली असून शिवसेनेने नाणार जाणार अशी घोषणा केली होती, पण नाणार गेला नाहीच, तसेच हे सरकार म्हणजे न पटणार्‍या नवरा बायकोचा संसार असल्याचंही यावेळी विखे-पाटील यांनी म्हटलं आहे.शिवसेना एवढा अवमान गिळून सत्तेत आहे. सरकारचा प्राण केव्हाच गेला आहे, पण शिवसेनेमुळे सरकार टिकले असून  सरकारने चार वर्ष फक्त अफवा पसरवल्या असल्याचंही विखे-पाटील यांनी म्हटलं आहे.

तसेच मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, ८ कोटीची गुंतवणूक, लाखो रोजगार, 89 लाख शेतकर्‍यांना कर्जमाफी ही सर्व मुद्यांवरुन सरकारनं फसवणूक केली असल्याचंही विखे-पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच चांद्यापासून बा़ंद्यापर्य़त लोक या सरकारला झोडपून काढतील, एवढा असंतोष सरकार बद्दल आहे. मुंबई डीपीमध्ये सरकारने मुंबई बिल्डरांना आंदण दिला आहे. सिडकोच्या जमिनीचा व्यवहार ज्या गतीने झाला आहे, त्यावरून संशयाची सुई मुख्यमंत्र्यांकडे वळत असल्याचंही यावेळी विखे-पाटील यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS