मुंबई – सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आज काँग्रेसचे नेते आणि सुजय लिखे यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मागील दोन तीन दिवस सातत्याने माध्यमातून जे सांगितलं जातं होतं. मी ठरवलं होतं वेगवेगळ्या स्तरावर प्रतिक्रिया आल्यानंतर भूमिका मांडायची. नगर लोकसभा निवडणुकीच्याबाबतीत माझ्या मुलासाठी हा सगळा संघर्ष निर्माण झाला हे चित्रं उभं केलं जातंय ते चुकीचं आहे असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे. जागावाटपाची चर्चा होत असताना निवडून येण्याचा निकष लक्षात घेऊन काँग्रेसने नगरची जागा मागितली होती, राष्ट्रवादीनेही काही जागांची अदलाबदलीची मागणी केली होती. ज्या जागा सातत्याने पराभूत होत होत्या त्याबाबत चर्चा सुरू होती. नगरची जागा काँग्रेसला मिळाली तर निवडून येऊ शकते. त्यासाठी समन्वय घडवून आणण्याचा आमचा प्रयत्न होता. अशावेळी पवारांनी आमचे वडील बाळासाहेब विखे यांच्याबद्दल केल़लं विधान बरोबर नव्हतं. आपण आघाडीचा धर्म पाळतो ते आज हयात नाहीत आ़णि त्यांच्याबद्दल एवढ्या ज्येष्ठ नेत्याने असं वक्तव्य करणं चुकीचं होतं.
तोपर्यंत सुजयचा निर्णय झाला नव्हता. जागावाटपाच्या चर्चेत माझ्या मुलाने वेगळ्या पक्षात जावं याची चर्चा माझ्याबरोबर झाली नव्हती. जागांची अदलाबदल करण्याची चर्चा सुरू होती. मात्र पवारांचे ते विधान आले त्यानंतर आपल्या आजोबाबाबत केलेल्या विधानामुळे सुजयने तो निर्णय घेतला असावा असंही विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
एकदा नव्हे दोनदा पवारांकडून विधान झालं, मी मात्र वादग्रस्त विधान करणं टाळलं. मला त्या विधानाने निश्चित दु:ख झालं आहे. मी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना भेटून हा सर्व घटनाक्रम त्यांच्यासमोर मांडणार आहे आणि तो जो निर्णय देतील तो तुमच्यासमोर मांडणार आहे.तसेच हायकमांड पेक्षा बाळासाहेब थोरात हे मोठे नाहीत. मला जे स्पष्टीकरण द्यायचे ते पक्षश्रेष्ठींना देईन. थोरातांच्या पक्षनिष्ठेबद्दल मी नंतर बोलेण असंही विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
तसेच मी नगरमध्ये सुजयच्या विरोधात प्रचार करणार नाही, पवारांनी जे विधान केलं त्यामुळे पवारांचा आमच्या वडीलांबद्ल विश्वास नाही. विखे कुटुंबाबद्दल जो द्वेष आहे त्यामुळे त्यांचा माझ्यावर विश्वास नाही. परंतु काँग्रेस पक्ष मला जिथे प्रचाराला जायला सांगेल तिथे मी जाईन असंही विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
COMMENTS