मुख्यमंत्र्यांनी सभागृहाचा अवमान केला, त्यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार – विखे पाटील

मुख्यमंत्र्यांनी सभागृहाचा अवमान केला, त्यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार – विखे पाटील

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचा अवमान केला असून त्यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचं वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सभागृहात सादर होण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी ‘आता आंदोलन करू नका, 1 डिसेंबरला जल्लोष करा’ असं विधान केलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचा अवमान केला असून येत्या अधिवेशनात त्यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचं विखे-पाटील यांनी म्हटलं आहे.

https://twitter.com/RVikhePatil/status/1063735556667031552

दरम्यान विखे-पाटील यांनी आज आझाद मैदानावर उपोषण करत असलेल्या मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. डॉ. मागासवर्गीय आयोगाचे सदस्य राजेश करपे यांनी अहवाल सादर करण्यापूर्वीच अहवालाबाबत प्रसारमाध्यमांना मुलाखती दिल्या. हा देखील सभागृहाचा हक्कभंग असून त्यांच्याविरोधातही हक्कभंगाचा प्रस्ताव आणला जाणार असल्याचंही विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

मराठा समाजाने केलेल्या मागण्या काही नव्या नाहीत, सरकारने मनात आणलं तर ते दिलेली आश्वासन पूर्ण करू शकतात, मात्र सरकारची इच्छाशक्ती दिसत नसल्याची टीकाही यावेळी विखे-पाटील यांनी केली आहे.

 

COMMENTS