राधाकृष्ण विखे-पाटील लवकरच भाजपमध्ये, गिरीश महाजनांसोबत बैठक सुरु !

राधाकृष्ण विखे-पाटील लवकरच भाजपमध्ये, गिरीश महाजनांसोबत बैठक सुरु !

मुंबई – काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील हे भाजपचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या भेटीला गेले आहेत. मुंबईतील गिरीश महाजन यांच्या बंगल्यावर महाजन आणि विखे यांच्यात बैठक सुरू असून विखे लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान पंतप्रधान मोदींच्या शपथविधीनंतर विखे हे काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन त्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.मोदींच्या शपथविधीनंतर राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे. या मंत्रीमंडळ विस्तारात विखेंना मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील नगरविकास खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. याबाबत चर्चा दरण्यासाठी विखे-पाटील यांच्यात बैठक सुरु आहे.

तसेच विखे पाटील यांच्यासोबत काँग्रेसचे चार आमदार, अनेक जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवकांसह भाजपात प्रवेश करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये मराठवाड्यातून एक आमदार, पश्चिम महाराष्ट्रातून एक तर मुंबईतून एक आणि आणखी एक आमदार असे चार आमदार राधाकृष्ण विखे पाटलांसोबत भाजपमध्ये जाणार आहेत. यामध्ये कालिदास कोळबंकर, जयकुमार गोरे, अब्दुल सत्तार हे आमदार विखे पाटलांसोबत भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. तर आणखी दोन आमदारांची नावे अजून समजू शकलेली नाहीत.

COMMENTS