मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या दिमतीसाठी शासकीय खर्चातून अलिशान कार देण्यात येणार आहे. एवढच नाही तर या समितीच्या वापराकरीता एकूण 20 कार खरेदीसाठी शासनाकडून मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने हिरवा कंदिल दिला असून, यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना कार खरेदीसाठी मंजुरी देण्यात आल्यामुळे आता नवा वाद निर्माण होणार असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान महागडी कार खरेदी करण्यास वित्त विभागाने नकार घंटा लावल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र विरोध डावलून सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कार खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यास, दबाव आणला असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे विरोधकांना आयता मुद्दा मिळाला असून याबाबत आता चंद्रकांत पाटील आणि भाजप सरकारवर टीका करण्यास आयता मुद्दा मिळाला असल्याचं दिसून येत आहे.
COMMENTS