सभागृहात शिक्षणमंत्री विनोद तावडे भावूक, बोलून दाखवली खंत !

सभागृहात शिक्षणमंत्री विनोद तावडे भावूक, बोलून दाखवली खंत !

मुंबई विधान परिषदेतील चर्चेदरम्यान शिक्षणमंत्री विनोद तावडे भावूक झाले असल्याचं पहावयास मिळालं आहे. शिक्षण विभागाच्या निर्णयावर विरोधकांनी नेहमी टीका केली परंतु एवढे उपक्रम राबवले, त्याचं कुणी एक शब्दानेही कौतुक केलं नसल्याची खंतही विनोद तावडेंनी बोलून दाखवली आहे. ‘खता तो जिंदगीभर मैं करता आया, धुल चेहरे पे थी, आयना पुच्छता रहा’, असं म्हणत विनोद तावडेंनी आपली खंत बोलून दाखवली आहे. तसेच थ्री इडियट पाहायला छान वाटतो. फुंसूक वांगडू इथे आले, त्यांनी चर्चा केली. लेह-लडाखच्या वांगडूंना आम्ही जे प्रयोग केले ते दिसले, पण तुम्हाला दिसत नाही असंही तावडेंनी विरोधकांना म्हटलं आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील माणसं प्रामाणिक आहेत परंतु त्यातली काही मतांसाठी, टाळ्यांसाठी खोटं बोलतात, असा टोलाही तावडेंनी लगावला आहे. तसेच नापास विद्यार्थ्यांना त्याच वर्षी परीक्षा द्यायची व्यवस्था करुन अनेकांचं आयुष्य वाचवलं. पोलिसांनीही या निर्णयाचं कौतुक केलं. कारण, ही मुलं शरमेने व्यसनाच्या आहारी जात होती. 70 हजार मुलं पहिल्या वर्षी पास झाले. या मुलांचं वर्ष वाचवलं हे तुम्हाला दिसलं नाही का असा सवालही विनोद तावडेंनी केला आहे.

दरम्यान काही शिक्षकांच्या समस्या आहेत. शिक्षणाची वारी केली आणि शिक्षकांचं कौतुक केलं. या वर्षी उर्दू शिक्षिकांनी विचारलं आमची का वारी नाही, उर्दू माध्यमातील शिक्षकांसाठीही वारी सुरू केली. तसेच आम्ही जबाबदारी घेतो, जबाबदारीपासून पळत नाही  असंही यावेळी विनोद  तावडेंनी म्हटलं आहे.

 

COMMENTS