मुंबई – अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विरोधकांनी सभागृहात घातलेला गोंधळ पाहून सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी विरोधकांना ऐतिहासिक टोला लगावला आहे. राज्यपालांच्या अभिभाषणाच्या मराठी अनुवादावरुन विधीमंडळात विरोधकांनी गदारोळ घातला. मराठी ऐवजी गुजराती भाषेत अनुवाद ऐकू आला असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या काळात मोगलांना सगळीकडे संताजी धनाजी दिसायचे, तशी विरोधकांना हल्ली गुजराती दिसत आहे, असा टोला विनोद तावडे यांनी विरोधकांना लगावला आहे.
दरम्यान अभिभाषणाचा गुजराती अनुवाद ऐकू आला असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधीमंडळाबाहेर माध्यमांशी बोलताना हा आरोप फेटाळून लावला. ‘राज्यपालांचे अभिभाषण इंग्रजीत होते. त्यांनी सुरुवातीला काही मिनिटे मराठीत अभिभाषण केले. नंतर ते इंग्रजीत बोलत होते. इंग्रजीतील अभिभाषणाचे मराठीत अनुवाद नसल्याचे लक्षात येताच मी स्वतः मराठी अनुवाद वाचण्यासाठी कंट्रोल रुममध्ये पोहोचलो, असे तावडें यांनी म्हटलं आहे.
COMMENTS