रत्नागिरी – शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. शिक्षकांच्या बदल्यांमध्ये अधिकारी भ्रष्टाचार करत असल्याची कबुली तावडे यांनी दिली आहे. शिक्षकांच्या बदल्यांमध्ये मंत्रालय ते अधिकारी चिरिमिरी घेत असल्याचं वक्तव्य विनोद तावडे यांनी केलं आहे. रत्नागिरीतील शिक्षणाची वारी या कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
दरम्यान शिक्षकांच्या बादल्यांचं कामकाज ऑफलाईन होतं, तेव्हा अधिकारी चिरीमिरी घ्यायचे त्यामुळे बदल्यांचं कामकाज आम्ही ऑनलाईन केलं असल्याचंही तावडे यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी शाळा बंदच्या निर्णयाचंही समर्थन केलं असून ८० टक्के निर्णयाचे वास्तव शिक्षकांपर्यत पोहचलंच नाही असही म्हटलं आहे. विनोद तावडे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
COMMENTS