मुंबई – शिक्षणमंत्री विनोद तावडे हे काल संध्याकाळी मालाड-मार्वे येथे रो रो जेट्टीच्या प्रकल्पाचे उद्घटान करण्यासाठी आले होते. या कार्यक्रमासाठी विनोद तावड़े हे आपल्या ताफ्यासोबत गोराई वरुन बोटीने येत असताना एक बाका प्रसंग त्यांच्यावर ओढवला. तावड़े हे गोराई हुन मार्वेला समुद्र मार्गे येत असताना सायंकाळी मार्वे समुद्र किनाऱ्यावर पाणी कमी असल्याने बोट किनाऱ्यापर्यंत येत नव्हती. दोन वेळा प्रयत्न केल्यानंतरही बोट किनाऱ्यापर्यंत आली नाही. त्यामुळे एकच धावपळ झाली आणि अखेर विनोद तावड़े यांना मनोरी ते मार्वे जाणाऱ्या दुसऱ्या बोटीत जावे लागले. त्या बोटीतुन प्रवास करून विनोद तावड़े यांना मार्वे समुद्र किनाऱ्यावर उतरले. आणि गोंधळावर पडदा पडला.
COMMENTS