मुंबई – राज्याचे माजी मंत्री दिवंगत डॉ. पतंगराव कदम यांचे चिंरंजीव विश्वजीत कदम यांना काँग्रेसनं सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. त्याठिकाणी काँग्रेसनं विश्वजीत कदम यांना उमेदवारी दिली असून विश्वजीत हे डॉ. पतंगराव कदम यांचे चिरंजीव असून युवक काँग्रेसचे ते अध्यक्ष आहेत. येत्या 28 मे रोजी मतदान होणार असून, 31 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.
दरम्यान या निवडणुकीमध्ये काँग्रेसने अपेक्षेप्रमाणे पतंगराव कदम यांचे सुपुत्र विश्वजित कदम यांना उमेदवारी दिली असून विश्वजित कदम हे प्रथमच विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. याआधी त्यांनी 2014 च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पुण्यातून निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना भाजपाच्या अनिल शिरोळे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र या पोटनिवडणुकीत उमेदवार न उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. कदम यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. तर भाजपाने उमेदवार उतरवण्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही.
COMMENTS