भाजपमध्ये जाणार का?, विश्वजीत कदम यांचं स्पष्टीकरण !

भाजपमध्ये जाणार का?, विश्वजीत कदम यांचं स्पष्टीकरण !

सांगली – लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला. त्यानंतर आता पक्षातील नाराज नेते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. अशातच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक आमदार पक्ष सोडतील असं बोललं जात आहे. यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत पतंगराव कदम यांचे सुपुत्र आमदार विश्वजीत कदम हे देखील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. पण याबाबत स्वत: विश्वजीत कदम यांनी खुलासा केला आहे. ‘मी भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्या खोट्या आहेत. भविष्यातही मी काँग्रेसमध्ये राहणार आहे,’ असं विश्वजीत कदम यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख भाजपच्या वाटेवर असल्याचीही चर्चा आहे. परंतु मी भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्या खोट्या आहेत. भविष्यातही मी काँग्रेसमध्ये राहणार आहे,’ असं विश्वजीत कदम यांनी म्हटलं आहे.

दरम्यान विश्वजित हे काँग्रेसचे माजी मंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यांचे पुत्र तर सत्यजित हे काँग्रेसचे माजी मंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र आहेत.
काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ, सक्षम नेतृत्व, जनाधार असलेले नेते असून ही काँग्रेस अंतर्गत गटबाजीमुळे या दोन्ही नेत्यांच्या कार्यकिर्दीला फटका बसत असल्याने, हे दोन्ही नेते, काँग्रेस सोडण्याच्या मनस्थितीत असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसमधील गटातटामुळे जिल्ह्यातील, सत्ताकेंद्र हातातून जात असल्याने, जनतेचे प्रश्न सोडवताना ही अडचणी येत असल्याचं म्हणण या नेत्यांचं आहे.

COMMENTS