सांगली – महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. उमेदवार निवडीबाबत या पक्षामध्ये हालचाली सुरु झाल्या असल्याचं दिसत आहे. काँग्रेसनं देखील उमेदवार निवडीसाठी हालचाली सुरु केल्या आहे. जे सक्षम उमेदवार आहेत आणि जे पक्षाशी निष्ठा ठेऊन काम करणार आहेत अशाच उमेदवारांना याठिकाणी काँग्रेस पक्ष संधी देणार असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी केलं आहे. ७० इमेलडी योजना पूर्ण झाल्याने मतदार आम्हालाच साथ देतील असा विश्वासही यावेळी विश्वजित कदम यांनी व्यक्त केला आहे.
तसेच महापालिकेतील आघाडीबाबत काँग्रेस पक्ष सकारात्मक असून राष्ट्रवादीचा प्रस्ताव आला आहे. मात्र स्थानिक नेते त्याच्यावर विचारविनिमय करत आहेत. तसेच जर नाही जमलं तर आम्ही स्वबळावर निवडणूक लढवण्यास सक्षम आहोत असंही विश्वजित कदम यांनी म्हटलं आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची सांगली महापालिकेत युती होणार का नाही याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
COMMENTS