ये क्या हुआ? क्यों हुआ?.. गृहमंत्र्यांकडून भाजपची खिल्ली

ये क्या हुआ? क्यों हुआ?.. गृहमंत्र्यांकडून भाजपची खिल्ली

मुंबई – ये क्या हुआ? कैसे हुआ? कब हुआ? क्यों हुआ?..ये ना पुछो!, अशा शब्दात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपची खिल्ली उडवली.  विधानपरिषदेच्या निकालानंतर अनिल देशमुख यांनी भाजपच्या जखमेवर मीठ चोळले. विधान परिषदेच्या निवडणुकीत पुणे, मराठवाडा, नागपूर या मतदारसंघात भाजपचा दारूण पराभव झाला.

ये क्या हुआ? कैसे हुआ? कब हुआ? क्यों हुआ?..ये ना पुछो!,विरोधकांच्या गर्विष्ठ माना जनतेने वाकवल्या. #महाविकासआघाडी ला महाराष्ट्रातील जनतेने जोरदार कौल दिलाय. आतातरी विरोधकांनी महाराष्ट्र घडवण्याच्या कामी सरकारला साथ द्यावी.ते जमत नसेल तर महाराष्ट्रद्रोही चाळे तरी बंद करावेत, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हंटले आहे. 

दरम्यान, आघाडीच्या उमेदवारांवर विश्वास टाकल्याबददल खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून आभार मानले, विधान परिषदेचा निकाल म्हणजेच मतदारांनी महाविकास आघाडीच्या कामाला दिलेली पोचपावती आहे, अशा विश्वास सुळे यांनी व्यक्त केले. यशासाठी अहोरात्र कष्ट करणारे कार्यकर्ते, मुख्यमंत्री ठाकरे, अजितदादा पवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी कष्ट घेतले. सर्वांच्या सुनियोजित अशा संघटित प्रयत्नातून हा विजय साकारला आहे, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे

 

COMMENTS