पालघर – विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. सकाळपासून ते आतापर्यंत मतदानाचा टक्का हवा तसा वाढला नाही. अनेकांनी मतदानाकडे पाठ फिरवली असल्याचं दिसत आहे. पालघरमधील केळवे रोड परिसरातील पूर्वेकडील झांजरोळी मतदान केंद्रावर मतदारांनी कडकडीत बहिष्कार टाकला असल्याचं दिसत आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत केवळ दोनच मतदारांनी मतदान केलं आहे. यामध्ये एका पुरुष आणि एका स्त्री मतदाराचा समावेश आहे.
दरम्यान केळवे रोड पूर्वेकडील नागरिकांनी वाहतुकीसाठी उड्डाणपुलाच्या मागणीसह मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी केळवे रोड पूर्वेकडील गावांनी मतदानावर बहिष्कार घातला आहे. प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. त्यामुळे मतदानासाठी घराबाहेर न पडता मतदारांनी घरात राहणंच पसंत केलं आहे. यामुळे या पट्ट्यातील नऊ मतदान केंद्रांवर बहिष्काराचं सावट कायम आहे.
COMMENTS