राज्य सरकार कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला वाऱ्यावर सोडणार नाही, विनायक मेटेंनी अशोक चव्हाणांवर केलेल्या टीकेला मंत्री वडेट्टीवारांचं प्रत्यत्तर! पाहा

राज्य सरकार कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला वाऱ्यावर सोडणार नाही, विनायक मेटेंनी अशोक चव्हाणांवर केलेल्या टीकेला मंत्री वडेट्टीवारांचं प्रत्यत्तर! पाहा

मुंबई – सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षण याचिकेवरील सुनावणी चार आठवड्यांसाठी लांबणीवर टाकली आहे. याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. यावर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्य सरकार कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला वाऱ्यावर सोडणार नाही. मराठा तरुणांवर अन्याय होऊन देणार नाही. तसेच सर्वोच्च न्यायालायने मराठा आरक्षणावरील याचिकेची सुनावणी पुढे ढकलल्यामुळे आता सरकार मराठा समाजाला समाजाचे हित लक्षात ठेवून नोकरभरती प्रक्रिया राबविण्याचा विचार करत आहे.नोकरभरती प्रक्रिया थांबवून इतर समाजातील तरुणांवर अन्याय होता कामा नये. त्यामुळे कायदेशीर सल्ला घेऊन इतर जागांची भरती करता येईल का, यावर विचार सुरु आहे. बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा, एवढीच आमची भूमिका असल्याचंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी अशोक चव्हाणांवर टीका केली होती. मी वेळोवेळी सांगत होतो अशोक चव्हाण यांच्याकडून समितीचे अधिकार काढून घ्यावे परंतु असं झाल नाही. उलट त्यांना जास्तच अधिकार देण्यात आले. याचा फटका मराठा समाजाला बसला आहे. आणि हे राज्य सरकारचे अपयश असल्याची टीका विनायक मेटे यांनी केली होती.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे याबाबत अनेक वेळा संघर्ष झाला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत वेळोवेळी माहिती दिली मात्र यांचे लक्ष नाही. मराठा उपसमीतीची अशोकराव चव्हाण यांच्याकडील ही जबाबदारी काढून घ्यावी . जर यात काय कमी जास्त झालं तर अशोक चव्हाण यांचा राजीनामा घेऊन सुद्धा काही उपयोग नाही. कर्तबगार माणसाकडे ही जबाबदारी द्यावी. सरकारने अनेक वेळा आमचं फक्त ऐकून घेतलं निर्णय घेतला नाही.सर्वोच्च न्यायालयात स्थगीती उठवण्यासाठी खंड पीठासमोर अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी अर्ज केला पाहीजे. ज्या खंडपीठाने आरक्षण फेटाळलं त्याच खंडपीठाकडे अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. असंही मेटे यांनी म्हटलं होतं. यावर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

COMMENTS